घरमहाराष्ट्रसाळाव पुलाची दुरावस्था

साळाव पुलाची दुरावस्था

Subscribe

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती अलिबाग-मुरूड-रोहा या तीन तालुक्यांना जोडणार्‍या पुलावर होऊ नये यासाठी या पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. साळाव रेवदंडा खाडीवरील पुलाची प्रचंड दुरावस्था झाली असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलाची वेळेत डागडुजी केली गेली नाही तर या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागपासून तुटणार आहे.

रायगड जिल्ह्यातील साळाव रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरुड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आले. परंतु या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. साळाव -रेवदंडा खाडी पुलाचे काम हे १९८६ साली करण्यात आले असून या पुलाची लांबी ५१० मीटर एवढी आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या काळात झाला आहे. त्यामुळे रोहा, मुरुडआणि अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. सालाव रेवदंडा खाडी पुलामुळे मुरुड तालुक्याचा आर्थिक विकास,सामाजिक,औद्योगिक झाला आहे.

- Advertisement -

या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई पुणे येथे जाण्यासाठी चणेरा, रोहा नागोठणे मार्गे वडखळ पेण किंवा साळाव जेट्टी वरून छोट्या होड्यांनी रेवदंडापर्यंत पाण्यातून प्रवास करावा लागत असे. मात्र हा पूल झाल्यानंतर वाहतूक जलद गतीने होऊन विकासाची दारे उघडली गेली.

अलिबाग -मुरूड-रोहा या तीन तालुक्यांना जोडणार्‍या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या असून पावसानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे -म. व. चव्हाण. उपअभियंता, सा.बा. विभाग. अलिबाग-रायगड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -