राज ठाकरेंनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला

Brij Bhushan after MNS allegations Raj Thackeray should learn something from Sharad Pawar
राज ठाकरेंनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याशी माझे चांगले संबंध आहे. त्यांच्याकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) काहीतरी शिकलं पाहिजे असा टोला उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांनी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना महाराष्ट्रातून रसद पुरवली असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. यानंतर मनसेच्या नेत्यांकडून बृजभूषण आणि शरद पवारांचा फोटो ट्विट करण्यात येत आहे. मनसेकडून ट्विट करण्यात आलेला फोटो तीन वर्ष जूना असल्याचे बृजभूषण सिंह यांनी सांगितले आहे. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात बृजभूषण सिंह यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली असल्याचा आरोप मनसैनिकांकडून करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसेकडून करण्यात आलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याला राष्ट्रवादीकडून सरद पुरवली गेली असा अप्रत्यक्ष आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यावर एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना शरद पवारांकडून काहीतरी शिकलं पाहिजे असा टोला लगावला आहे.

माझे पवारांसोबत चांगले संबंध

बृजभूषण सिंह यांनी मनसेच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. मी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्ती संघाचा संरचक आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील पुण्यात एक कार्यक्रम झाला होता. ज्यामध्ये लगातार तीन दिवस राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे दिवसातून तीन तास तिथे उपस्थित राहत होते. मला याचा गर्व आहे की, त्यांचा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यांनी मला पुष्पहार घातला आहे. तीन दिवस त्यांनी कोणताही पुष्पहार घातला नाही, देशात सुशिलकुमार, बजरंग यांसह ज्यांना ज्यांना मेडल मिळाले आहे.

यासाठी क्रिडा क्षेत्रात जे काम केले आहे. त्यामुळे माझं ते कौतुक करतात. तीन दिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी पवारांसाठी आलेले पुष्पहार माझ्या गळ्यात घातले. मला याचा गर्व आहे. माझे पवारांसोबत चांगले संबंध आहे. आजही शरद पवार मला भेटले तर त्यांच्याशी नजरा चोरून मी उभा राहणार नाही. मी त्यांना नमस्कार करेल माझ्यासाठी ते चांगले नेता आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकलं पाहिजे असा टोला बृजभूषण सिंह यांनी लगावला आहे.


हेही वाचा : “ब्रिज”चे निर्माते म्हणत मनसेकडून पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो ट्विट, राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात रसद पुरवल्याचा आरोप