Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शिंदे-ठाकरे गटात उडी घेत बृजभूषण सिंह यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

शिंदे-ठाकरे गटात उडी घेत बृजभूषण सिंह यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Subscribe

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे सरकार हे अल्पमतात आल्याचे दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मागील दोन दिवसांपासून या घडामोडींमध्ये सक्रिय झाले आहेत. परंतु राज ठाकरेंवर सतत टीका करणाऱ्या उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी शिंदे-ठाकरे गटात उडी घेत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सिंह यांनी जाहीर व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंना भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली आहे. शिवसैनिक तोडफोड करत आहेत. पक्षाच्या नावावर लढून गेला म्हणून बंडखोरीचा अधिकार नाही, असं शिंदे गटाला सांगत आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी तुमच्याशी बंडखोरी केली तर दु:ख होत आहेत. परंतु भाजपसोबत मिळून निवडणूक लढवली. भाजपच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला. आमच्या कार्यकर्त्यांनी साध घेतली आणि सत्तेसाठी तुम्ही कुठे गेलात, असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

जे भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी केले तेच शिवसैनिक त्यांच्यासोबत करत आहेत. बृजभूषण सिंह यांच्याशी पंगा घेतला आणि ठाकरे कुटुंबाचं अस्तित्व संपत आले आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शरण या अन्यथा अस्तित्व उरणार नाही, अशा इशारा बृजभूषण सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे बृजभूषण सिंह चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बृषभूषण सिंह यांचं कौतुक केलं होतं. बृजभूषण सिंहांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. तसेच त्यांचे महाराष्ट्राशी जुने संबंध आहेत, असं संजय राऊतांनी म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं.


- Advertisement -

हेही वाचा : मविआसोबत फारकत घेऊन भाजपसोबत युती करा, विजय शिवतारेंचाही शिंदे गटाला पाठिंबा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -