घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार?, वाद पेटण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार?, वाद पेटण्याची शक्यता

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बृजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २० ते २५ डिसेंबरदरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

महाराष्ट्र केसरी या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहणार आहेत. दरम्यान बृजभूषण सिंह यांनी कठोर भूमिका घेत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. मात्र, राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा रद्द केला होता. परंतु बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार असल्याने मनसे कोणती भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

५ जून रोजी राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. परंतु काही वर्षांपूर्वी ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल माफी मागावी, अन्यथा उत्तर प्रदेशात पाय ठेवून देणार नाही, असं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी हा दौरा रद्द केला होता.

राज ठाकरेंनी प्रकृतीचं कारण देत कार्यकर्त्यांची सुरक्षा धोक्यात येईल असं सांगत हा दौरा रद्द केला होता. परंतु त्यावेळी काही मनसेचे पदाधिकारी हे अयोध्येत जाऊन आले होते. तसेच मनसे आणि भाजपमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. मात्र, आता बृजभूषण सिंह हे महाराष्ट्रात येणार असून मनसेची पुढील भूमिका काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राज्य शासन शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार, दीपक केसरकरांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -