घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"भाऊ गाडी थांबवा, तुमच्या बसचं चाक मागे पडलंय"; इगतपुरीत एसटीचा तीन चाकांवर...

“भाऊ गाडी थांबवा, तुमच्या बसचं चाक मागे पडलंय”; इगतपुरीत एसटीचा तीन चाकांवर प्रवास

Subscribe

इगतपुरी : अहो भाऊ, गाडी थांबवा! तुमच्या बसचं चाक मागे पडलं… हे ऐकताच चालक एसटी बस थांबवतो आणि बसमधील ३५ प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन जाणार्‍या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही ही बस फक्त तीन चाकावर धावल्याची आश्चर्यकारक घटना इगतपुरी जवळ घडली आहे. विशेष म्हणजे जवळपास ३५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन
लोकांचा जीव धोक्यात घालण्याची लीला ह्या बसच्या चालकाने केली आहे.

इगतपुरी जवळ महामार्गावरून ही बस धावत असतांना अन्य एका वाहनधारकाने या बसला ओवरटेक करून बसचालकाला याबाबत सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर ही बस महिंद्रा कंपनीजवळ थांबवण्यात आली. या एसटी बसचा क्रमांक MH 15 BT 4129 असा असून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्‍या चालकावर व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित प्रवाशांनी यावेळी केली. अकोलेहुन कसाराकडे येतांना अनेक ठीकाणी वळणदार रस्ते, घाट असल्याने अशा बेजबाबदार कारभारामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. प्रवाशांचे देव बलवत्तर म्हणुन सुदैवाने ही घटना उघडकीस आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या नंतर इगतपुरी आगारातुन नवीन टायर आणुन बसला बसवुन ही एसटी बस कसार्‍याकडे सोडण्यात आली.

- Advertisement -

 राज्य परिवहन महामंडळाच्या बसची काय अवस्था आहे. कशा धोकेदायक स्थितीत प्रवासी वाहतूक केली जात आहे. महामंडळ याबाबत किती निर्ढावलेल आहे. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी किती बेजबदार आहेत आदीचे ज्योतक म्हणजे अशा प्रकारची जीवघेणी घटना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -