घरBudget 2024Budget 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार ऐवजी 'एवढी' रक्कम; किसान सन्मान...

Budget 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार ऐवजी ‘एवढी’ रक्कम; किसान सन्मान निधीत होणार वाढ?

Subscribe

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाककडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागातील लोकांचं लक्ष या अर्थसंकल्पावर आहे. अशातच आता आगामी अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी किंवा पीएम-किसानच्या लाभार्थ्यांना सरकार मोठी भेट देण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेत सुमारे 50 टक्के वाढ अपेक्षित आहे. काही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही रक्कम वार्षिक 6 हजार ते 9 हजार रुपये केली जाऊ शकते. (Budget 2024 Farmers will get 9 thousand amount instead of 6 thousand Increase in Kisan Samman Fund)

हेही वाचा – Hemant Soren : अखेर 40 तासांनंतर हेमंत सोरेन प्रकटले; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होणार चौकशी

- Advertisement -

लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 2019 मध्ये पीएम-किसान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला सुरुवात झाल्यापासूनच ती लोकप्रिय झाली आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. गेल्या अर्थसंकल्पात पीएम किसानवर 60 हजार कोटी रुपये खर्च केले होते. अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेसाठीची तरतूद वाढवणे अपेक्षित आहे. याशिवाय पीक विमा आणि ग्रामीण रोजगार योजनेच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गावातील मोठ्या लोकसंख्येला या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यामुळे केंद्रातील मोदी सरकारला तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

पीएम किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार काही उपाययोजनाही करू शकते. त्याचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा हा त्यांचा उद्देश आहे. या अंतर्गत, पात्रता निकष सोपे केले जाऊ शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. त्यामुळेच अनेक अर्थतज्ज्ञांचा असा अंदाज आहे की , सरकार पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम सुमारे 50 टक्क्यांनी वाढवू शकते. ही रक्कम वार्षिक 6 हजार 9 हजार रुपये केली जाऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांऐवजी विद्यार्थीच दिमतीला

गरीब, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांवर सरकारचा फोकस

देशातील मोठी लोकसंख्या खेड्यात राहते आणि पीएम किसान सारख्या योजनांचा थेट फायदा त्यांना आतापर्यंत झाला आहे. पीएम किसान निधी सारख्या योजना त्यांना तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. याशिवाय केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आधीच स्पष्ट केले आहे की, त्यांच्यासाठी गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी या चारच जाती असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात या चार जातींवर केंद्राचा फोकस असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -