घरमहाराष्ट्रBudget Session : आमदारांमधील भांडणाचे विधान परिषदेत पडसाद; सभागृहात गोंधळ

Budget Session : आमदारांमधील भांडणाचे विधान परिषदेत पडसाद; सभागृहात गोंधळ

Subscribe

विधानपरिषदेत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिरे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मुद्दा उपस्थित केला आहे. यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी देखील दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्या झालेल्या भांडणाची माहिती सभागृहात मागितील मागवील.

मुंबई : विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येते. शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे या दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला . शिंदे गटाच्या आमदारांच्या भांडणाचे पडसाद हे विधान परिषदेत उमटले.

विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मुद्दा उपस्थित केला. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात झालेल्या भांडणाची माहिती सभागृहात मागितली. या मागणीवरून ठाकरे गटाच्या आमदारांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज 1 तासासाठी तहकूब केले.

- Advertisement -

राज्याचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात भांडण झाले आहे. या प्रकरणी न्यूज चॅनेलवर बातम्या दाखविल्या जात आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले. तर, या दोघांच्या भांडणाची सत्यता जाणून घेण्यासाठी सचिन अहिर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडले. या भांडणाचा खुलासा करावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Maharashtra Budget Session : “भिडले नाहीत, फक्त आवाज चढला”, भुसे-थोरवे वादावर देसाई म्हणतात

- Advertisement -

…तरच आमदारांच्या भांडणाची माहिती देईन – गोऱ्हे

सचिन अहिर यांच्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “या प्रकरणाची माहिती घेऊ आणि योग्य सांगण्यासारखे असेल तर आम्ही सांगू. हे दोन्ही नेते बरीच वर्षं एकाच पक्षात होते. ते दोघेही आधीपासून स्नेही आहेत. या दोघांमध्ये काय झाले? याबाबत माहिती घेऊन तुम्हाला सांगण्यासारखे असेल तर मी सांगेन; नाही तर सांगणार नाही. त्या दोघांमध्ये खासगी काही असेल तर, मी ते काय सांगणार? जर लॉ एंड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला असेल तर मी पोलिसांकडून माहिती घेऊन सभागृहात सांगते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -