घरट्रेंडिंगमुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरतोय मरिन ड्राइव्हवरील इमारतींसाठी धोकादायक

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरतोय मरिन ड्राइव्हवरील इमारतींसाठी धोकादायक

Subscribe

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱ्या या प्रकल्पाचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱ्या या प्रकल्पाचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे ही त्याची पोचपावतीच आहे, असे उद्गार माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी काढले होते. मात्र हाच प्रकल्प आता नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या मरिन ड्राइव्ह येथील रहिवाशांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (Buildings On Marine Drive Shook due to Protected Stone Was Removed For Coast Road Project)

मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे कामाचे टप्पे एकापाठोपाठ पूर्ण होत आहेत परंतु, या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी बंधाऱ्यांसारखे (टेट्रोपॉडस) संरक्षित दगड काढण्यात आली आहेत. त्यामुळे मरिन ड्राइव्ह येथील काही इमारतींना भूकंपासारखे कंपने जाणवत आहेत. याबाबत संबंधित स्थानिकांचे म्हणणे असून त्यांच्यामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मरिन लाइन्स परिसरात असलेल्या श्री निकेतन इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाश्याने काही इमारतींमधील रहिवाशांना भूकंपासारखे धक्के जाणवत असल्याचे म्हटले. परिणामी रहिवाशांच्या दृष्टीने ही बाब गंभीर आणि भीतीदायक झाली आहे. त्यामुळे रहिवाशांनी मुंबई महापालिका प्रशासक-आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठविले आहे.

“ज्या ठिकाणी बंधारे काढण्यात आले आहेत. तिथल्या काही इमारतींना भूकंपसदृश्य कंपने जाणवत आहेत. तसेच, सध्या पावसाळ्यात जोरदार लाटांमुळे निर्माण होणारा परिणाम मरिन ड्राइव्ह येथील बंधाऱ्यामुळे शोषला जात होता. पण आता बंधाऱ्यांअभावी तो फटका काही इमारतींना सोसावा लागत असल्याचे पालिका आयुक्त चहल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, ही गंभीर बाब असून त्यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मार्ग काढून ही समस्या सोडविली पाहिजे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचानॉन-ब्रॅण्डेड धान्यावरील जीएसटी रद्द करण्यासाठी पाठपुरवा करू; मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -