घरमहाराष्ट्रभाजप कार्यकर्त्यांनी नेहा पेंडसेला केली धक्काबुक्की

भाजप कार्यकर्त्यांनी नेहा पेंडसेला केली धक्काबुक्की

Subscribe

भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. बुलडाण्यामध्ये दहिहंडी कार्यक्रमा दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की केली.

बुलडाण्यामध्ये दहीहंडीनिमित्त आयोजिक कार्यक्रमाता अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. आधीच भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तर दुसरीकडे बुलडाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी अभिनेत्री नेहा पेंडसेला केलेल्या धक्काबुक्कीमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर नेहा पेंडसेच्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Buldhana bjp workers misbehaved with actress neha pendse

बुलडाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये भाजपच्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

Posted by My Mahanagar on Wednesday, 5 September 2018

- Advertisement -

भाजप कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की

बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये भाजपच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्य श्वेता महाले यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मालिका आणि चित्रपटातील अभिनेत्री नेहा पेंडसेला आमंत्रित करण्यात आले होते. चिखलीतल्या आशिर्वाद मेडिकलसमोरील मैदानात दहिहंडीचा कार्यक्रम सुरु होता. नेहा पेंडसे या कार्यक्रमासाठी स्टेजवर जात असताना उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिला धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.

चिडलेली नेहा कार्यक्रम सोडून निघून गेली

भाजप कार्यकर्त्यांनी नेहा पेंडसेला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा चिडलेली पहायला मिळत आहे. धक्काबुक्कीनंतर भाजपची महिला पदाधिकारी नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र नेहाने चिडून तिच्यासमोर हात जोडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. चिडलेली नेहा कार्यक्रम सोडून निघून गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -