Homeमहाराष्ट्रSudden Baldness : अखेर बुलढाण्यातील त्या विचित्र आजाराचा शोध लागला...पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल...

Sudden Baldness : अखेर बुलढाण्यातील त्या विचित्र आजाराचा शोध लागला…पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आला समोर

Subscribe

राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांतील गावकरी त्रस्त आहेत. जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. आणि त्यांना टक्कलाची समस्या भेडसावते आहे. अचानक उद्भवलेल्या या समस्येने आरोग्य यंत्रणा देखील चक्रावली होती.

बुलढाणा : राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांतील गावकरी त्रस्त आहेत. जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. आणि त्यांना टक्कलाची समस्या भेडसावते आहे. अचानक उद्भवलेल्या या समस्येने आरोग्य यंत्रणा देखील चक्रावली होती. यामागचे कारण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गुरुवारी तातडीने येथील पाणी तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीचे आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. (buldhana hair loss case shocking information revealed in water report)

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावांमधील नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास होत असल्याचे समोर आले. यासाठी अनेकांनी आपले गाऱ्हाणे शासनदरबारी मांडले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्थानिक जलस्रोतांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हा त्रास एवढा वाढला आहे की, आतापर्यंत येथील जवळपास दोन डझन लोकांचे केस गेले आहेत. आरोग्य विभागाने जे पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले होते, त्याचा अहवाल मिळाला असून हा अहवाल धक्कादायक आहे.

हेही वाचा – Anjali Damania : मुंडेंचा राजीनामा गरजेचा; परळीत सापडलेल्या 109 मृतदेहाप्रकरणी दमानियांचे गंभीर आरोप

बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते म्हणाले की, जिल्ह्यातील केस गळती प्रकरणी पाण्याचे जे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्याचा अहवाल आला आहे. हे पाणी वापरण्यासाठी तसेच पिण्यासाठी योग्य नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. नायट्रेटचे प्रमाण 10 टक्के असायला हवे ते 54 टक्के एवढे झाले आहे. तर क्षाराचे प्रमाण 2100 आहे. ते केवळ 110 असायला पाहिजे. त्या भागातील पाणीच घातक आहे. आर्सेनिक, लीड तसेच रासायनिक घटक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यातील पाण्याचे नमुने हे 3 तारखेचे असून त्याची तपासणी 6 तारखेला संबंधित यंत्रणेने केली आहे. पाणी डंप केल्याने यातील नायट्रेटचे प्रमाण वाढत असते. मात्र, नायट्रेटचे प्रमाण वाढल्याने केस गळतात किंवा टक्कल पडते आहे असे या केसेसमध्ये म्हणता येणार नाही, अशीही माहिती समोर आली आहे. पाण्याचे नमुने सदोष आढळले तरी शेगाव तालुक्यातील केस गळती तसेच टक्कल पडण्याच्या आजाराच अद्याप निदान झालेले नाही. या परिसरातील केस गळतीच्या सात रुग्णांचे डोक्यावरील त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, या भागातील बोअरवेलमधील पाण्यात जड धातू आढळून आल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टक्कल पडलेल्यांची संख्या 51 वर

शेगांव तालुक्यात टक्कल पडलेल्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे.

शेगावच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली बहेकर यांनी याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने मंगळवारी गावा – गावात जात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. ज्यांना याचा त्रास झाला आहे, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा – Pune Murder : पुण्याच्या आयटी कंपनीत भरदिवसा तरुणीची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

सुरुवातीला लोकांना डोक्यात खाज येण्यास सुरुवात होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जवळपास सगळे केस गळतात आणि टक्कल पडते. केवळ पुरुषच नाही तर महिलांना देखील याचा त्रास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही डॉक्टरांनी यासाठी काही प्रमाणात शॅम्पूचा वापर कारणीभूत असू शकतो, असे म्हटले आहे. मात्र, ज्यांनी कधीही शॅम्पू वापरला नाही त्यांनाही याचा त्रास झाला आहे.