घरक्राइमभरधाव ऑटोरिक्षा घुसली लग्न मंडपात; भीषण घटनेत वऱ्हाड्याचा मृत्यू

भरधाव ऑटोरिक्षा घुसली लग्न मंडपात; भीषण घटनेत वऱ्हाड्याचा मृत्यू

Subscribe

लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा (Autorickshaw) घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात ही घटना घडली असून यामध्ये एक जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते. या घटनेनंतर सजनपुरी (Sajanpuri) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा (Autorickshaw) घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात ही घटना घडली असून यामध्ये एक जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते. या घटनेनंतर सजनपुरी (Sajanpuri) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी या घटनेनंतर दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. (buldhana man killed as speeding autorickshaw crashes wedding hall sajanpuri buldhana)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, खामगावातील सजनपुरी (Sajanpuri in Khamgaon) परिसरात मंगळवारी (30 मे) रात्री लग्न सोहळा पार पडत होता. त्यावेळी रात्री 9 वाजताच्या सुमारास लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसली. या घटनेत दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्या व्यक्तीचा वाटेत मृत्यू झाला. रामू सावरकर असे त्याचे नाव होते.

- Advertisement -

हेही वाचा – शिवशाहीत आत्महत्या केलेल्या एसटी चालकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; महिला कंडक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल

परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ऑटोरिक्षा चालक विशिष्ट समाजाचा असल्याने आणि जखमी वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. या परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुलीचा प्रेमविवाह, आई-वडिलांची आत्महत्या; नातेवाइकांनी केला मुलाच्या घरासमोर अंत्यविधी

नाशिकच्या नाग्या-साक्या पुलावरून कोसळली कार

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) नांदगावमध्ये नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळून भीषण अपघात (Car Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -