घरमहाराष्ट्रBuldhana News: वाग्दत्त वधूच्या घरी होळी करून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 20...

Buldhana News: वाग्दत्त वधूच्या घरी होळी करून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; 20 दिवसांवर होते लग्न

Subscribe

बुलढाणा: डॉक्टर निलेश रामराव माळोदे याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूर राहिलं आहे. वाग्दत्त वधूला होळीचा सण देऊन परतत असताना, त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा भीषण अपघात झाला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात डॉ. निलेळ माळोदेंसह त्यांच्या आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडिल गंभीर जखमी आहेत. (Buldhana News AKola Family returning from Holi celebration at bride s home The wedding took place on 20 days)

डॉक्टर निलेश रामराव माळोदे याचं सुखी संसाराचं स्वप्न अधूर राहिलं आहे. वाग्दत्त वधूला होळीचा सण देऊन परतत असताना, त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा भीषण अपघात झाला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात डॉ. निलेळ माळोदेंसह त्यांच्या आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडिल गंभीर जखमी आहेत.

- Advertisement -

कुठे झाला अपघात?

बाळापूर येथील रहिवासी रामराव माळोदे यांचा मुलगा दंत शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश माळोदे याचा विवाह इंदूर येथील एका मुलीशी ठरला होता. नववधूला होळीचा सण देण्याकरता रामराव लक्ष्मण माळोदे, डॉक्टर निलेश माळोदे आणि सौ. संगीता रामराव माळोदे हे तिघे जण कारने इंदूर येथे गेले होते. कार्यक्रम आटपून परतीच्या रस्त्याला असताना रविवारी संध्याकाळी गावाच्या वेशीवर पोहोचताच कारवर काळाने घाला घातला. अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झाला आहे. खामगाव ते बाळापूर मार्गावरील हॉ़टेल सुदर्शन ढाब्याजवळ रविवारी रात्री ही घटना घडली.

20 एप्रिल रोजी विवाह

डॉक्टर निलेश रामराव माळोदे यांचा येत्या 20 एप्रिल रोजी विवाह होणार होता. त्याच्या विवाहाची सर्व तयारी घरात झाली होती. मित्र-परिवाराला निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. परंतु लग्नाआधीच त्यांचा अपघातात मृत्यू झाला.

- Advertisement -

(हेही वाचा: Ramesh Baraskar : वंचितच्या दुसऱ्या यादीनंतर शरद पवार गटातून बारसकरांची हकालपट्टी; कारण काय?)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -