घरमहाराष्ट्रधार्मिक कार्यक्रम ठरला कारणीभूत, बुलडाण्यातील एकाच गावात १५५ जण बाधित

धार्मिक कार्यक्रम ठरला कारणीभूत, बुलडाण्यातील एकाच गावात १५५ जण बाधित

Subscribe

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढत आहे. यातच बुलडाणा जिल्ह्यात एकाच गावात चक्क १५५ जण कोरोना बाधित आढळले आहे. गावात पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे १५५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.  जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगावमध्ये हा प्रकार घडला आहे. या झाडेगाव सात दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान १५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जातेय. त्यामुळे बुलडाण्यातील हा धार्मिक कार्यक्रम कोरोना रुग्ण वाढण्यासाठी कारणीभूत ठरला. मात्र स्थानिक प्रशासनाकडून आता योग्यती पावले उचलली जात असून एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग कसा वाढला याचा तपास केला जात आहे. गावात १५५ जण कोरोनाबाधित आढळल्याने या झाडेगावाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाकडून या गावात बाहेर व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा निर्धास्त होती. मात्र अचानक १५५ जण एकत्र कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणांची धावाधाव सुरु झाली.

गावातील प्रत्येक नागरिकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. झाडेगावात सात दिवसांपूर्वी झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात बाहेरुन काही लोक आले होते. हा कार्यक्रम साजरा करताना अनेकांनी सोशल डिस्टसिंग, मास्क, सॅनिटाझर या नियमांना पायदळी तुडवले. त्यामुळे लोकांच्या निष्काळजीपणामुळे १५५ जणांना कोरोनाची लागण झाली. या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या घरात आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेयं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले होते की, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय सभा, कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी आजही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला कोरोना यंत्रणात आणण्यासाठी पुन्हा अडचणी येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -