घरताज्या घडामोडीदहिवडला बिबट्यांचा धुमाकूळ; पुन्हा एक गो-हा केला फस्त

दहिवडला बिबट्यांचा धुमाकूळ; पुन्हा एक गो-हा केला फस्त

Subscribe

देवळा : दहिवड येथे शनिवारी दोन जनावरांचा बळी घेतल्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा खडकी मळा भागात एका गो-ह्यावर हल्ला चढवत त्यास ठार केला. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने त्वरित कारवाई करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शनिवारी (दि. १३ ) रोजी दोन गोरह्यांचा बळी घेतल्यानंतर आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबटयाने शेतकरी काशिनाथ पवार यांच्या खडकी मळा येथील गट नंबर ८५९ मध्ये गो-ह्यावर हल्ला करून ठार केला आहे. ही घटना शनिवारी घडलेल्या घटनास्थळापासून अवघ्या ७०० ते ८०० मिटर अंतरावर असल्याने शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळा वनविभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करावा व गोधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाने तातडीने पाऊल उचलावीत, अशी मागणी दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज वैद्य यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -