घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसमृध्दी महामार्गावरून धावणार बुलेट ट्रेन

समृध्दी महामार्गावरून धावणार बुलेट ट्रेन

Subscribe

केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा, लवकरच दिल्लीत बैठक

नाशिक : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णत्वास असून त्याच मार्गावर आता हायस्पीड बुलेट ट्रेन आणणार आहोंत, केंद्र सरकारने याबाबत पाठींबा दिला असून लवकरच आता राज्य सरकारशी बोलणे केले जाणार आहे. त्यामुळे समृद्धी मार्ग तर झाला, आता याच मार्गावरून बुलेट ट्रेन धावणार अशी घोषणा रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
मंत्री रावसाहेब दानवे हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी नाशिकमध्ये होते. त्यांनी भगूर येथील वीर सावरकर यांच्या सावरकर वाड्याला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले, देशातील रेल्वे ही महत्वाची संस्था असून रेल्वे प्रशासन तोट्यात येऊन नागरिकांना सेवा देण्याचे काम करते आहे.

राज्यातील सर्वात महत्वाचा मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग पार पडत असून आता याच मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे हा प्रवास अवघा तीन तासात शक्य होणार आहे. याबाबत राज्य सरकारशी बोलणे होणार असून केंद्र सरकारचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे दानवे यांनी सांगितले. या प्रकल्पासंदर्भात लवकरच दिल्लीत बैठकही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले अनेकजण बोलतात की रेल्वे प्रवास मोफत होणे आवश्यक आहे. मात्र तुम्ही एखाद्यावेळी मुबंईला फिरायला आलात तर तेव्हा एक रुपयाचं तिकीट काढतात, त्या तिकिटासाठी रेल्वे प्रशासन 55 पैसे देते असते. ग्राहकांचे 45 पैसे मिळून ते तिकीट दिले जाते. त्या एक रुपयाच्या तिकिटातून तुम्ही मुंबई फिरून येतात, असं गणितचं त्यांनी मांडले. ते म्हणाले रेल्वे ही सेवा देणारी संस्था आहे, आम्हाला होणारा तोटा आम्ही मालवाहतूकीतून काढतो. 2 कोटी 40 लाख रुपयांचा आमचा बजेट आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेल्वे प्रशासनाला नेहमी पैसे पुरवत असतात. त्यातून लवकरच वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई नागपूर तीन तासांत

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णत्वास असून याच मार्गावर आता बुलेट ट्रेन धावणार असून रस्ता आहे, जागा कमी लागणार असल्याने राज्य सरकारला कमी निधी द्यावा लागणार आहे, आता केंद्र आणि राज्य सरकार हे डबल इंजिन असल्याने या प्रकल्पाला लवकरच गती मिळेल. यासाठी दिल्लीला बैठक होणार असून मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनसाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यामुळे हा तीन तासांत प्रवास होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -