घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रओझरच्या खंडोबा यात्रेतील बैलगाडा शर्यत रद्द

ओझरच्या खंडोबा यात्रेतील बैलगाडा शर्यत रद्द

Subscribe

नाशिक : ओझर येथील खंडेराव मंदिरात चंपाषष्ठी निमित्त मोठा यात्रोत्सवाची जुनी परंपरा आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यातच खंडोबा यात्रेनिमित्त भरणार्‍या बैलगाडा शर्यतीचे मोठे आकर्षण असते. मात्र, यंदा बैलगाडा शर्यत स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. काही महिन्यापासून जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी आजारचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

ओझर येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने  बैलगाडा शर्यत स्पर्धेचे मोठे आयोजन करण्यात येते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची यात्रा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राज्यभरातून शेकडो बैलगाडा शर्यत स्पर्धक ओझर मध्ये दाखल होत असतात. त्याचसोबत, अतिशय महत्वपूर्ण मानल्या जाणार्‍या या शर्यती बघण्यासाठी हजारो बैलगाडा शर्यत प्रेमीही ओझरमध्ये हजेरी लावतात. मात्र, जिल्ह्यात वाढलेला लम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा खंडोबा यात्रेनिमित्त होणारी शर्यत आता रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

जिल्ह्यातील लम्पीची स्थिती
  • आतापर्यंत 83 जनावरे दगावली 
  • १ हजार 692 जनावरांना बाधा
  • १ हजार ३०९ जनावरे आजारातून बाहेर आली
  • ३०० जनावरांवर सद्यस्थितीत उपचार सुरु
  • 99.99 टक्के लसीकरण पूर्ण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -