Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCongress : नाना पटोलेंचे आरएसएसशी संबंध म्हणूनच...; पराभूत काँग्रेस उमेदवाराचा गंभीर आरोप

Congress : नाना पटोलेंचे आरएसएसशी संबंध म्हणूनच…; पराभूत काँग्रेस उमेदवाराचा गंभीर आरोप

Subscribe

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशातच पराभतू झालेल्या नागपूर मध्य विधानसभेचे उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशातच पराभतू झालेल्या नागपूर मध्य विधानसभेचे उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Bunty Shelke made a serious allegation that Nana Patole had links with RSS)

बंटी शेळके यांनी 2019साली निवडणूक लढविली होती, त्यावेळी त्यांना केवळ चार हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते विजय नक्की मिळवू या उत्साहात प्रचार करताना दिसले. संघ मुख्यालयासमोर प्रियांका गांधी वाड्रा यांची प्रचार मिरवणूक घेणारे आणि भाजपा कार्यालयात प्रचार करून चर्चेत आलेले काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके हे विजयाचे दावेदार मानले जात होते. मात्र त्यांना यंदाच्या निवडणुकीतही 11,632 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पराभूत झालेल्या बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politic : मुख्यमंत्री ठरण्याआधीच घडामोडींना वेग? जितेंद्र आव्हाडांनी घेतली शिंदेंची भेट

एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बंटी शेळके म्हणाले की, मुंबई आज काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत मी नाना पटोले यांची तक्रार केली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची आवश्यकता होती. पण त्यांनी तसे प्रयत्न केले नाही. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत जर विजय मिळवायचा असेल तर काँग्रेस नेतृत्वाने आताच यात लक्ष घालून नाना पटोले यांना बाजूला करायला हवे किंवा त्यांना समज द्यायला हवी, अशी मागणी बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

- Advertisement -

नाना पटोले यांचे आरएसएसशी संबंध

दरम्यान, बंटी शेळके म्हणाले की, मी टिळक भवनासमोर उभा राहून सांगतोय की, नाना पटोले यांचे आजही संघाशी संबंध आहेत. माझ्या मतदारसंघात प्रियांका गांधी वाड्रा आलेल्या असतानाही काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचारासाठी आले नाहीत. प्रियांका गांधी वाड्रा या फक्त माझा प्रचार करायला आल्या नव्हत्या. तर त्या काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. असे असतानाही काँग्रेसची संघटना माझ्यासाठी प्रचारात उतरली नाही, असा आरोपही बंटी शेळके यांनी केला.

हेही वाचा – Eknath Shinde : ‘ते तुम्हीच ठरवा…’, अमित शहांच्या भेटीत नाराज, व्हायरल फोटोवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया 


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -