घरमहाराष्ट्रमुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्या वाढल्या, सुनील प्रभू म्हणाले

मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्या वाढल्या, सुनील प्रभू म्हणाले

Subscribe

मुंबई : अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने आज सभागृहामध्ये चर्चा सुरू असताना विरोधी पक्षातील मान्यवर नेत्यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था भाष्य केले. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सुद्धा मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या आणि भुरट्या चौऱ्यांचे वाढलेले प्रमाण निदर्शनास आणले.

अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने मुंबईत आणि प्रमुख शहरांमध्ये होणारी ड्रग्ज तस्करी, दमन सारख्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या पोलिसांकडून होणारी दारूची तस्करी, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी खनिज आणि त्यावरती होणारा भ्रष्टाचार, महिला-अल्पवयीन मुलींवर होणार अत्याचार, शक्ती कायद्याला होणारा विलंब आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टींवरती विविध विरोधी पक्षातील सदस्यांनी विचार मांडले.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द; २०२४ ला मोदींना पर्याय कोण?

सगळ्या महत्त्वाच्या मुद्दयासोबत मुंबई शहरांमधील चौऱ्यांचे प्रकरण ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी समोर आणले. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि मुंबई या राज्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी या चौऱ्यांच्या प्रकरणावर यंत्रणा लावून नियंत्रण ठेवावे आणि घरफोड्या करणारे जे मोठे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करावे. मुंबई शहरातील स्लम विभागात मोठ्या प्रमाणात ड्रग्स, हिरोईन आणि गांजा याचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. ड्रग्ज माफियाने मुंबईला ड्रग्जचे सेंटर बनवले आहे. त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर बरबाद होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत दिवसाढवळ्या पाच जणांवर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी 

मागच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांना सभागृहामध्ये संपूर्ण ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्याबाबत निवेदन दिले होते आणि उपमुख्यमंत्र्यांनीही पोलीस यंत्रणा सक्षम पद्धतीने काम करेल असे आश्वासन दिले होते. परंतु मुंबई शहरातील ड्रग्स तस्करी अद्याप थांबलेली नाही. या रॅकेट प्रकरणी प्रमुख सूत्रधार कोण आहे हे या पोलिसांनी लवकर शोधून काढायला पाहिजे, असेही सुनील प्रभू संसदेत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -