घरCORONA UPDATEक्वारंटाईन झालेल्या कुटुंबाच्या घरात घरफोडी, चोरट्यांनी लांबवले अडीच लाखाचे दागिने

क्वारंटाईन झालेल्या कुटुंबाच्या घरात घरफोडी, चोरट्यांनी लांबवले अडीच लाखाचे दागिने

Subscribe

उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेक परिसर सील करण्यात आलेले असून अनेकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आल्याचा फायदा येथील भुरटे चोर घेत आहे.

क्वारंटाईन सेंटरमध्ये कुटुंबियांसह क्वारंटाईन झालेल्या एका महिलेच्या घराची खिडकी तोडून चोरट्याने अडीच लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उल्हासनगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेक परिसर सील करण्यात आलेले असून अनेकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आल्याचा फायदा येथील भुरटे चोर घेत आहे. उल्हासनगर येथील शांती नगर येथे राहणाऱ्या बीना गुप्ता यांचा परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे त्यांना तसेच आजूबाजूच्या काही कुटुंब यांना ११ मे रोजी क्वारंटाईन सेंटर मध्ये १४ दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी १४ दिवस पूर्ण होऊन त्या कुटुंबासह घरी परतणार होत्या, तत्पूर्वी बीना गुप्ता यांनी आपल्या एका नातेवाईकांना सोमवारी घराची साफ सफाई करण्यास सांगितले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

अज्ञात चोरट्यानी गुप्ता यांच्या घराची खिडकी तोडून खिडकीतून घरात प्रवेश करून घरातील दागदागिने आणि रोकड असा एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरी करून पोबारा केला असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अस्लम खातीब यांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सपोनि खातीब यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -