इंदूरहून जळगावात येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू

इंदूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात १३ प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तसेच, आणखी १२ ते १५ प्रवासी बेपत्ता असल्याचे समजते.

MSRTC Bus Accident

इंदूरहून जळगावाच्या दिशेने येणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात १३ प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तसेच, आणखी १२ ते १५ प्रवासी बेपत्ता असल्याचे समजते. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. तसेच, क्रेनच्या सहाय्याने नदीत कोसळलेली बस बाहेर काढण्यात आली आहे.

नेमका अपघात कसा झाला?

या अपघातग्रस्त बसमध्ये सात कुटुंब होते. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये १३ लहान मुलेही होती. धार जिल्ह्यातील नर्मदा नदीवरून ही बस जात असताना चुकीच्या दिशेने एक वाहन आले आणि त्या वाहनाला अपघातापासून वाचवण्यासाठी एसटी बसच्या चालकाने बस डाव्या बाजूला जोरात वळवली.

त्यानंतर ही बस थेट नर्मादा नदीवरील असलेल्या पुलाच्या कठड्यावर आदळली. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट नदीत कोसळली. सध्यस्थितीत स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने धाव घेत बचाव कार्याला सुरूवात केली आहे.

मात्र, तोपर्यंत जवळपास १३ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, १५ जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र बसमधील चालक आणि वाहकाबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

ओळख पटलेल्या मृतांची माहिती

  • राम गोपाल जांगीड रा. नांगल कला गोविंदगड जयपूर राजस्थान.
  • हेमराज जोशी वय 70 वर्ष रा. मल्हारगड उदयपूर राजस्थान.
  • श्रावण चौधरी वय ४० वर्षे रा. शारदा कॉलनी अमळनेर जळगाव महाराष्ट्र.
  • आनंदा पाटील वय ६० वर्षे रा. पिलोडा अमळनेर.
  • कमलाबाई नीबाजी पाटील वय 55 वर्षे रा. पिलोडा अमळनेर जळगाव
  • एकनाथ पाटील वय 45 वर्षे रा. अमळनेर जळगाव (वर 1 ते 6 पर्यंत मृतांची ओळख आधार कार्डावरून झाली होती)
  • मुर्तझा बोरा वय २७ वर्षे रहिवासी मूर्तिजापूर अकोला महाराष्ट्र.
  • अब्बास रा. नूरानी नगर इंदूर.

धार जिल्ह्यात बसला भीषण अपघात

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाच्या जळगावमधील अमळनेर बस आगारातील ही बस होती. ही बस इंदूरमधून सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास निघाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी १० वाजण्याचा सुमारास या बसला अपघात झाला.

बसमध्ये पुण्यातील अनेक जण

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेवेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. शिवाय, अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची आहे. विशेष म्हणजे बसमध्ये पुण्यातील अनेक जण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – पॅचअपसाठी परब, नार्वेकर आणि सरदेसाईंच्या माध्यमातून ठाकरेंचा फडणवीसांशी संपर्क, फडणवीसांचे मात्र तोंडावर बोट…