घरमहाराष्ट्रBus Accident : मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसला अमरावतीत भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Bus Accident : मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसला अमरावतीत भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Subscribe

अमरावती : मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीहून ही बस मेळघाटमार्गे मध्य प्रदेशला जात होती. या बसमधून 25 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातात दोन महिला आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत, तर यांतील पाच जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती समर आली आहे. (Bus Accident: Terrible accident in Amravati bus going to Madhya Pradesh, three died)

हेही वाचा… Somalian Pirates : भारतीय नौदलाने जेरबंद केलेले 35 सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या तुकईथडला जाणाऱ्या परतवाडा आगाराच्या बसला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. जवाहर कुंड येथे घाट वळणावर असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ज्यानंतर ही बस थेट 30 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर सध्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वेगाने बचावकार्याला सुरुवात केली. परंतु, या अपघातात इंदू समाधान गंत्रे (वय वर्ष 65) आणि ललिता चिमोटे (वय वर्ष 30) अशी अपघातात दगावलेल्या महिलांची नावे आहेत. तर ज्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे, त्याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. आरोग्य यंत्रणेकडून जखमींना रुग्णवाहिकेतून तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, अशी माहिती परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -