Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Video : जळगावात बस-कंटेनरचा अपघात; आमदार चंद्रकांत पाटलांनी जखमींना स्वतःच्या गाडीतून नेले...

Video : जळगावात बस-कंटेनरचा अपघात; आमदार चंद्रकांत पाटलांनी जखमींना स्वतःच्या गाडीतून नेले रुग्णालयात

Subscribe

जळगाव : मुंबई नागपूर महामार्गावर (Mumbai Nagpur Highway) कंटेनरने आज (15 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास अचानक ब्रेक मारल्याने अपघात झाला. मागून येणाऱ्या एसटी बसने कंटेनरला (Bus container accident) जोरदार धडक दिल्याने काही महिलांसह पुरुष जखमी झाले. दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या (Jalgaon) मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी समयसूचकता दाखवताना आपली गाडी थांबवली आणि बसमधील जखमींना स्वतःच्या गाडीतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याशिवाय उर्वरित जखमींसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन बसमधील शेवटचा जखमी प्रवाशी रुग्णालयात पोहचेपर्यंत चंद्रकांत पाटील घटनास्थळी थांबून होते. त्यांनी जखमींना केलेल्या मदतीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Bus container accident in Jalgaon MLA Chandrakant Patil took the injured to the hospital in his own car)

हेही वाचा – घोषणा प्रकाश आंबेडकरांची, समीकरणे बदलणार मविआची पण भाजपाच्या हाती हुकूमाचा पत्ता

- Advertisement -

एम.एच. 14 बी टी 3998 या क्रमाकांची जळगाव मुक्ताईनगर ही एसटी बस आज मुंबई नागपूर महामार्गावरुन जळगावच्या दिशेने जात होती. ही बस गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ येताच पुढे चालत असलेल्या कंटनेरने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या एसटी बस चालकाला याचा अंदाज आला नाही आणि त्याने कंटेनरच्या मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसच्या पुढच्या भागाला मोठे नुकसान झाले असून या जोरदार धडकेत बसमधील प्रवाशांना तोंडाला जबर मार बसला तर, काहींचे डोके पुढील सीटच्या लोखंडी रॉडवर आपटल्याने दुखपात झाली.

- Advertisement -

अपघात झाल्यानंतर त्याच मार्गावरून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील जळगाव दिशेने कामानिमित्त जात होते. अपघात झाल्याचे दिसल्यावर त्यांनी तत्काळ स्वत:च्या गाडीतून खाली उतरले आणि एसटी बसमध्ये चढले. यावेळी त्यांनी जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिकेची वाट न बघता जखमींना स्वत:च्या गाडीत बसवत चालकाला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितेल. तसेच बसमधील उर्वरित जखमींसाठी त्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून शेवटचा जखमी प्रवाशी रुग्णालयात जाईपर्यंत घटनास्थळी थांबून राहिले.

हेही वाचा – Sambhaji Bhide : भारताचा राष्ट्रध्वज भगवा करावा, भिडेंच्या शिवप्रतिष्ठानने काढली पदयात्रा

विशेष म्हणजे यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष जळगाव जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यावरील होत असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना जखमींवर वेळेत आणि योग्य ते उपचार करण्याचा सूचना दिल्या. याशिवाय त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्‍यांच्याकडून जखमींच्या पुढील उपचारासाठी तत्काळ मदत जाहीर करून घेतली. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

- Advertisment -