घरमहाराष्ट्रपैसै देऊन भाजपने खोटा जातीचा दाखला व्हायरल केला; रोहित पवारांचा गंभीर आरोप

पैसै देऊन भाजपने खोटा जातीचा दाखला व्हायरल केला; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Subscribe

जातीच्या दाखल्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपने पैसे देऊन खोटा जातीचा दाखला व्हायरल केला असल्याचं रोहित पवार म्हणाले.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जातीचा दाखला खूप व्हायरल झाला. त्यानंतर हा जातीचा दाखला खोटा असल्याचं समोर आलं. या जातीच्या दाखल्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपने पैसे देऊन खोटा जातीचा दाखला व्हायरल केला असल्याचं रोहित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (By paying money BJP made fake caste certificate viral Serious accusation of Rohit Pawar)

रोहित पवार म्हणाले की, भाजपची ती प्रथा आहे. भाजपला सत्य कधी समजत नाही. त्यांना खोट्याच गोष्टी कळत असतात. त्यामुळे जो दाखल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो खरा दाखला नाही. भाजपचे जे काही पैसे घेऊन काम करणारे सोशल मीडियाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना ट्रोल आर्मी म्हटलं जातं. त्यांनी हे काम केलं आहे. त्यांना प्रत्येक कॉमेंटला 3 रुपये आणि प्रत्येक लाईकला 10 पैसे अशा हिशोबाने जे काम करतात त्यांनी हे उद्योग केले आहेत, असा आरोप रोहित पवारांनी यावेळी केला.

- Advertisement -

भाजप सत्तेसाठी तर आम्ही सत्यासाठी लढतो

रोहित पवार म्हणाले की, भाजप सत्तेसाठी लढत आहे आणि आम्ही सत्यासाठी लढतो. सत्य आम्हाला माहित आहे. असत्याची बाजू घेऊन भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत यायचं आहे. त्यामध्ये सामान्य लोकांचं नुकसान झालं तरी त्यांना फरक पडत नाही, त्यामुळे भाजपचे नेते जसा विचार करतात तसाच विचार त्यांचे कार्यकर्ते करतात आणि त्यामुळेच शरद पवार यांचा जातीचा खोटा दाखला तयार करून व्हायरल करण्यात आला, असं रोहित पवार म्हणाले.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा जाकीचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जातीच्या प्रमाणपत्रात ओबीसी प्रमाणपत्र पवारांनी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं. हा जातीचा दाखल खोटा असल्याचं त्या म्हणाल्या. आता रोहित पवारांनीही हा जातीचा दाखल खोटा असून भाजपने हेतूपुरस्सर व्हायरल केल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: ‘हे’ थेट भाजपात सामील का होत नाहीत? ठाकरे गटाची शिंदे गटावर जहरी टीका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -