Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र स्वतःचा बंगला विकून..., शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा टोला

स्वतःचा बंगला विकून…, शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा टोला

Subscribe

मुंबई : आमचा पक्ष अधिकृत शिवसेना आहे, निवडणूक आयोगानं आम्हाला चिन्हही दिले आहे. त्यामुळे आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. परंतु काही तांत्रिक अडचण आली आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला तर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे मत शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – … तर कमळावर निवडणूक लढवू; शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

- Advertisement -

गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीतील दोन पक्ष फुटले आणि भाजपासमवेत सत्तेत सहभागी झाले. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह यावरून दोन गटात वाद सुरू आहे. याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह, हे दोन्ही शिंदे गटाचे असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कोणाचे यााबबत अद्याप संभ्रम कायम आहे. शिवाय, शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे.

- Advertisement -

यापार्श्वभूमीवर, आमचा पक्ष अधिकृत शिवसेना आहे, आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. परंतु काही तांत्रिक अडचण आली आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला तर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे मत शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे…, ठाकरे गटाची काका-पुतण्या भेटीवर प्रतिक्रिया

अंबादास दानवे यांनी याबाबत ट्वीट करत, शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. अरेरे! ‘शिव्या फेम’ आमदार किशोर पाटील असे बोलले असतील तर, याला ‘स्वतःचा बंगला विकून दुसऱ्याच्या घरात भाड्याने राहायला जाणे म्हणतात’. सन्मानजनक वाट सोडून स्वतःची वाट लावून घेणार हे चाळीस असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

- Advertisment -