घरताज्या घडामोडीBypoll 2021: पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात पोटनिवडणूकीचे अपडेट काय ? शिवसेनेचे दिल्लीकडे पाऊल

Bypoll 2021: पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात पोटनिवडणूकीचे अपडेट काय ? शिवसेनेचे दिल्लीकडे पाऊल

Subscribe

देशातील २९ विधानसभा तर तीन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकांची आज मतमोजणी सुरू आहे. देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या पोट निवडणूकीत ३० ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाच्या निवडणूकीत तृणमूल कॉंग्रेस तसेच शिवसेनेने चमकदार कामगिरी केली आहे. तर महाराष्ट्रात कॉंग्रेसला आपली जागा कायम ठेवण्यात यश आले आहे. दादरा नगर हवेली येथे शिवसेनेच्या कलाबेन डेलकर या उमेदवाराचा पहिलाच असा महाराष्ट्राबाहेरचा विजय आहे. तर पश्चिम बंगामध्ये तृणमूल कॉंग्रेसने सर्व जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात देगलूर विधानसभा मतदारसंघात जितेश अंतापूरकरांना विजय मिळवण्यात यश आले.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने चारही जागांवर विजय खेचून आणत मोठा विजय मिळवला आहे. चारही विधानसभा जागांवर टीएमसीने विजय मिळवला आहे. उदयन गुहा यांनी दिनहाता येथील जागा जिंकली. भाजपच्या उमेदवाराला याठिकाणी पराभूत केले. सुब्रता मोंडल यांनीही १ लाख ४३ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. तसेच टीएमसीने करदाह आणि सांतीपूर येथे मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातही कॉंग्रेसने चार ठिकाणी विजय मिळवला. फतेहपूर, अरकी, जुब्बल कोटखाई आणि मंडीची लोकसभेची जागाही जिंकली. राजस्थानमध्ये कॉंग्रेसला विजय मिळाला आहे. धारियावाड विधानसभा जागेवर १८ हजारांनी कॉंग्रेसने विजय मिळवला. तर वल्लभनगरमध्येही कॉंग्रेस आघाडीवर होती. भाजपने जोबात येथील विधानसभेची जागा जिंकली. तर लोकसभेच्या खंडवा आणि पृथ्वीपूर या विधानसभेच्या जागेवर भाजप आघाडीवर आहे. भाजप तसेच युपीपीएल घटक पक्षाने आसाममध्ये विजय मिळवला आहे. भाजप आणखी एका जागेवर आघाडी मिळवली आहे.

- Advertisement -

हरयाणात एल्लेनाबाद येथे आयएनएलडीच्या अभय चौटाला यांनी ६५ हजारांच्या फरकाने विजय मिळवला. तर बिहारमध्ये जेडीयूने खुशेश्वर अस्थानची विधानसभेची जागा कायम ठेवली आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने पहिल्यांदाच विजयी खाते उघडताना दादरा नगर हवेली येथून विजय मिळवला आहे. दिल्लीच्या दिशेने ही आगेकूच असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.

तर महाराष्ट्रात कॉंग्रेसने देगलूर येथील जागा जिंकली आहे. कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरने या जागेवर मोठी आघाडी मिळवली आहे. २७ व्या फेरीनंतर ३९ हजार ४०० मतांच्या फरकाने कॉंग्रेसने या जागेवर आघाडी मिळवली आहे. अंतापूरकर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. भाजपच्या सुभाष साबणे हे या जागेवर मागे पडले आहेत. कर्नाटकात भाजपने विजय मिळवत सिंदगी येथून भाजपचे भुसानूर रमेश बलप्पा यांनी विजय मिळवला. गोसाबा विधानसभा जागेवर सुब्रता मोंडल यांनी विजय मिळवला.


हेही – Dadra Nagar Haveli bypolls result : दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी, शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -