Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Cabinet Decison: लाखो शेतकऱ्यांना शिंदे सरकारचा दिलासा; एक रुपयात मिळणार पीक विमा

Cabinet Decison: लाखो शेतकऱ्यांना शिंदे सरकारचा दिलासा; एक रुपयात मिळणार पीक विमा

Subscribe

आता केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवली जाणार आहे.

आता केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळत होते आणि त्यात अजून 6 हजार राज्य सरकार देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच, बेरोजगारी कमी करण्यासाठी आयटी क्षेत्राला चालना देणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.  ( Cabinet Decision Shinde Fadnavis government’s relief to lakhs of farmers Get crop insurance for one rupee )

मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय

 • या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी देते. आता त्याच धर्तीवर राज्य सरकारही 6 हजारांचा निधी शेतकऱ्यांना देणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
 • कामगारांची सुरक्षा, आरोग्य कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता लाखो कामगारांचे हित जपले
 • केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
 • डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेस मुदतवाढ, योजना आणखी तीन जिल्ह्यातील राबवणार.
 • सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. 22.18 कोटी खर्चास मान्यता
 • महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
 • राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. 95 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
 • कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. 25 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
 • बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्याहन मिळणार. अधिमूल्यात 50 टक्के सवलतीचा निर्णय
 • अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची 105 पदांची निर्मीती करणार
 • नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त 1710 कोटीच्या खर्चास मान्यता

( हेही वाचा: Sachin Tendulkar : तंबाखूच्या जाहिरातासाठी बऱ्याच ऑफर्स आल्या पण… तेंडुलकरचा मोठा खुलासा )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -