घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्ताराअगोदरच बदल्यांचा धमाका

मंत्रिमंडळ विस्ताराअगोदरच बदल्यांचा धमाका

Subscribe

दोन ते तीन टप्प्यांत होणार अधिकार्‍यांच्या बदल्या

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर ३० डिसेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. अनेक नेत्यांची मंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी लॉबिंग सुरू केली असताना प्रशासनातील अनेक बड्या सनदी अधिकार्‍यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराची धास्ती घेतल्याची माहिती पुढे आली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्ताराअगोदरच अनेक बड्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत बदल्यांच्या फाईलींवर सही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दोन ते तीन टप्प्यांत या अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मंत्रिमंडळ विस्ताराअगोदर पहिल्या टप्प्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर बदल्यांचा दुसरा टप्पा सुरू होईल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० डिसेंबरला या मंत्रिमंडळाचा होणार आहे. यासाठी सरकारकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या विस्तारात साधारणपणे ३० मंत्र्यांचा समावेश होणार असून मुंबईत होणार्‍या या शपथविधीवर सध्या राज्य सरकारचा प्रशासकीय गाडा हाकणारे अनेक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. या विस्तारात अनेक खात्यांची अदलाबदल होणार आहे.या बदल्या दोन ते तीन टप्प्यांत केल्या जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील बदल्या मंत्रिमंडळ विस्ताराअगोदर पूर्ण केल्या जाणार असून येत्या दोन दिवसांत या बदल्यांचा बार उडवून दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली आहे.

- Advertisement -

राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकार्‍यांवर आपले वर्चस्व ठेवण्याच्या हेतूने बदल्या केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर काही अधिकार्‍यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या विरोधात भूमिका जाहीर केली होती. ही भूमिका लक्षात घेत काही सनदी अधिकार्‍यांना साईड पोस्टिंग केले जाऊ शकते, अशी चर्चा बुधवारी दिवसभर मंत्रालयात सुरू होती.

विधान भवनात तयारी सुरू
महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी ३० डिसेंबरचा मुहूर्त निश्चित केला असून यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. हा शपथविधी सोहळा विधान भवनात होणार आहे. त्यानुसार या शपथविधी सोहळ्याची तयारी गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

३६ मंत्र्यांचा सोमवारी शपथविधी
येत्या ३० डिसेंबरला होणार्‍या शपथविधीत एकूण ३६ मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. ज्यात शिवसेनेकडून १० कॅबिनेट मंत्री आणि ३ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीचेही १० कॅबिनेट मंत्री आणि ३ राज्यमंत्री शपथ घेतील. काँग्रेसकडून ८ जणांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली जाणार असून २ राज्यमंत्री यावेळी शपथ घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -