घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आता हिवाळी अधिवेशनानंतरच

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आता हिवाळी अधिवेशनानंतरच

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी २८ नेव्हेंबर रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अजूनही नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचे कार्य पूर्ण झालेले नाही.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी २८ नेव्हेंबर रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दोन दिवसांत विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यात यश आले. शपथ घेतलेल्या मंत्र्यांसाठी शासकीय बंगल्यांची देखील वाटप झाल. त्यानंतर आता प्रत्येकाचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाकडे आहे. मात्र, हा विस्तार आता हिवाळी अधिवेशनानंतरच होणार असल्याची माहिती शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मिळत आहे.

खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला का होणार उशिर?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन झाले. खरेतर त्याचदिवशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची शेवटची संयुक्त बैठक होती. त्या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अजित पवार हे अचानक भाजपसोबत गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला. त्यामुळे या परिस्थितही महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी महत्त्वाचे होते. या सर्व घडामोडींमध्ये तिन्ही पक्षांची खातेवाटपाबाबतची चर्चा अपूर्णच राहिली. आता सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्ष यावर सविस्तर चर्चा करणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती करण्यासाठी घाई नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गृह मंत्रालयाचा आग्रह धरला आहे. मात्र त्यावर शिवनसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या तिन्ही पक्षांच्या चर्चांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हिवाळी अधिवेशनाअगोदर मुख्यमंत्र्यांचा पहिला दिल्ली दौरा

नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होणार आहे. हे अधिवेशन १६ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान होणार आहे. मात्र, त्याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ ते १२ डिसेंबर दरम्यान दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे. तिथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन १२ डिसेंबरला संपणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ९ डिसेंबर रोजी भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे ९ डिसेंबर रोजी सोनिया गांधी यांचा वाढदिवस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -