घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांना एनडीआरएफपेक्षा जास्त नुकसानभरपाई देणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

शेतकऱ्यांना एनडीआरएफपेक्षा जास्त नुकसानभरपाई देणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Subscribe

एनडीआरएफपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. २ हेक्टरपर्यंतच नुकसानभरपाई दिली जात होती. आता ही मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

शिंदे – फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यांतर आज पहिल्यांदा मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफपेक्षा जास्त नुकसानभरपाई मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. (Cabinet meeting decided to give more compensation to farmers than NDRF)

मुख्यमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसानभरपाई मिळाली नव्हती त्यापेक्षा जास्त नुकसानभरपाई आता मिळणार आहे. एनडीआरएफपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. २ हेक्टरपर्यंतच नुकसानभरपाई दिली जात होती. आता ही मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

या बैठकीत मेट्रो ३ च्या कामाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, २०२३ पर्यंत मेट्रो ३ चे काम करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मधल्या अडीच वर्षांत मेट्रो ३ च्या कराशेडचे काम रखडले होते. फक्त २९ टक्केच काम पूर्ण झाले आहेत. मात्र, आता या कामाला गती येणार आहे. मेट्रो ३ चे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच, मेट्रो ३ च्या प्रकल्पासाठी खर्च वाढला आहे. याबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकित प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर चर्चा होऊन १० हजार कोटींचा खर्च वाढवण्यात आला आहे. याआधी हा प्रकल्प २३ हजार कोटींसाठी प्रस्तावित होता. मात्र, आता खर्च वाढल्याने ३३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. यापैकी २५ टक्के निधी महाराष्ट्रातील इक्विटीमधून येणार आहे. तर, २५ टक्के केंद्र सरकार देणार आहे. उर्वरित रक्कम जायकामधून देण्यात येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -