घरमहाराष्ट्रCovid Pandemic: राज्यातील महाविद्यालये १ महिना उशिरानं सुरू; कोरोनामुळे झाला विलंब

Covid Pandemic: राज्यातील महाविद्यालये १ महिना उशिरानं सुरू; कोरोनामुळे झाला विलंब

Subscribe

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कॉलेज १ महिना उशिरानं सुरू होणार आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बघता राज्य करकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारने अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक म्हणजेच कॉलेज सुरु होण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केलेली आहे. मात्र, या अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे कोविडमुळे वर्ष २०२१-२०२२ मध्ये नमूद केलेल्या वेळेत कार्यवाही होऊ शकणार नाही. याच कारणामुळे हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु

कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून पालकांसह विद्यार्थ्यांकडून शाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून पुढील महिन्यात शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळणार आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -