Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप, जयंत पाटील यांची बोचरी टीका

दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप, जयंत पाटील यांची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : दुष्काळग्रस्त, विकासाचा मोठा अनुशेष असलेल्या मराठवाड्यात आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी (17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी दोन दिवस शहरात मुक्कामी असणार आहेत. मंत्रिमंडळाची बडदास्त ठेवण्यासाठी शहरातील पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – खर्चाचा वाद : पंचतारांकित मंत्रिमंडळाच्या बैठकीला इंडिया आघाडीचे प्रत्युत्तर

- Advertisement -

मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे. पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारने गंभीरपणे पहायला हवे, असे सांगतानाच, इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळे रोजगाराच्या बाबतीत येथील लोकांचा भ्रमनिरास झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – त्याच घोषणा आणि तीच फसवणूक… ठाकरे गटाची राज्य सरकारवर जोरदार टीका

दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचे रूप दिले आहे. अतिउत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार, अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासने देखील पूर्ण केली जातील, अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -