घरताज्या घडामोडी'मी असतो तर कानाखाली चढवली असती', मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली

‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र दिनावरील भाषणावर टीका करताना राणेंचा तोल ढळला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) नेहमीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्र सोडत असतात मात्र आज टीका करत असताना त्यांची जीभ घसरली आणि मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारण्याची भाषा नारायण राणेंनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र दिनावरील भाषणावर टीका करताना राणेंचा तोल ढळला. नारायण राणे सध्या जन आर्शीवाद यात्रेवर आहेत. आज त्यांची यात्रा रायगड जिल्ह्यातील महाड येथे आली तेव्हा मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा राणेंनी केली. तसेच राणेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख देखील यावेळी करण्यात आला. राणेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Cabinet Minister narayan Rane slams CM Uddhav Thackeray)

 

- Advertisement -

‘ज्यांना देशाचा स्वातंत्र्य दिन कितवा हे माहिती नाही त्यामाणसाविषयी मी बोलणार नाही,अशा व्यक्तीच्या कानशिलात लगावली पाहिजे’, असे वक्तव्य राणेंनी केले.

‘त्यांना बोलण्याचा अधिकार तरी आहे का. बाजूला सेक्रेटरी ठेवा आणि बोल. स्वातंत्र्यदिनाला किती वर्ष झाली? सत्तर काय? हिरक महोत्सव का? मी असतो तर एक कानाशिलात चढवली असती. राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्य दिनाची माहिती नसावी. स्वातंत्र्यदिन माहित नसलेल्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत,असा घाणाघात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केला.

- Advertisement -

भाजपाला काय कळत हे सांगणारे तुम्ही आमचे अडव्हाइजर नाही. त्यांचे अडव्हाइज काय त्यांनाच कळत नाही ते आम्हाला काय सांगणार. काही तरी अपशकुनासारख बोलू नका, असे म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

नारायण राणेंच्या जन आर्शीवाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस होता. आज ते कोकण दौऱ्यावर असताना महाड येथील काही लोकांची भेट घेऊन राणेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणेंना मंदिरे आणि दहीहंडी संदर्भातला प्रश्न विचारला असताना त्यावर उत्तर देत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टिकास्र सोडले आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले.


हेही वाचा – राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं; गुलाबराव पाटलांची जहरी टीका

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -