Breaking: ठाकरे सरकारमधील आणखी एक कॅबिनट मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus image
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाबाधित रुग्णांचा राज्यातील आकडा ५० हजारांच्या वर गेला असताना आणखी एक धक्कादायक बातमी हाती येत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील आणखी एक कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असून ते आता ठणठणीत आहेत. यानंतर पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सदर मंत्री हे काही दिवस मुंबईत होते. त्यानंतर मागच्या आठवड्यातच ते आपल्या जिल्ह्यात परतले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कोरोना चाचण्या करुन घेतल्या होत्या. त्यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र आज पुन्हा तिसरी चाचणी घेण्यात आली होती. ज्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून ते त्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी सदर मंत्र्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नसून त्यांची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती मिळत आहे.