मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, त्याआधीच हे सरकार पडणार – आदित्य ठाकरे

मुंबईतल्या वरळी येथील जांभोरी मैदानात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित आदित्य ठाकरे यांनी केले. कार्यकर्त्यांना संबोधताना ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यावर गटावर हल्लाबोल केला.

aaditya thackeray

‘आपले मुख्यमंत्री दिल्लीला जातात, विस्तार कधी होणार हे विचारायला. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, त्याआधीच हे सरकार पडणार आहे’, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. (Cabinet will not be expanded this government will fall before that says Aditya Thackeray)

मुंबईतल्या वरळी येथील जांभोरी मैदानात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित आदित्य ठाकरे यांनी केले. कार्यकर्त्यांना संबोधताना ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यावर गटावर हल्लाबोल केला. ‘आपले मुख्यमंत्री दिल्लीला जातात, विस्तार कधी होणार हे विचारायला. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, त्याआधीच हे सरकार पडणार आहे. मुख्यमंत्री दोवोसला 28 तासांसाठी गेले होते. त्यावेळी 40 खोके खर्च केले, ते कुठे खर्च केले. आपण त्यांना अनेक विषयांवर चर्चेचे आव्हान दिले आहे. एकाचेही त्यांनी उत्तर दिलेले नाही. आमचे एकही आव्हान त्यांनी स्वीकारले नाही’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हे राजकारण देशाला धोक्याकडे नेतंय

‘कॅसेट बंद करा, काम दाखवा, नाहीतर चालते व्हा, असे जनता आता सरकारला सांगत आहे. शिवसेना सोडण्याचे अनेक कारणे सांगतात. आम्हाला खरे कारण सांगायला लावू नका. हे राजकारण देशाला धोक्याकडे नेत आहे. जे स्वातंत्र्य आपण लढून मिळवले, ते स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. 40 गद्दार डरपोक आमदारांमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही. वर्षभरापासून अनेक महापालिकांवर वर्षभरापासून प्रशासक आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

समाज शिकेल तर आपल्या देशाचाही विकास होईल

‘आपण सीबीएससी, आयसीएससी, आयजीसीएससी बोर्ड आणला आहे. समाज शिकेल तर आपल्या देशाचाही विकास होईल. आधी गळक्या शाळा होत्या आपण हे चित्र बदलले. शाळेला लॉटरी लावावी लागली. पण गद्दार सत्तेवर आल्यावर त्यांनी कंत्राटदारांची लॉटरी लावली. हे मुबंई विकायला निघाले आहे. महाराष्ट्राची धूळफेक सुरू आहे. मुंबईत 6 हजार 80 कोटींचा रस्त्यांचा घोटाळा आहे’, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

गद्दार सत्तेवर आल्यापासून एकही रोजगार आला नाही

‘पुढची पिढी शेतकरी बनायला तयार नाही, त्यांचा लोंढा शहराकडे वाढणार आहे. आता शहरातही तरुणांसाठी रोजगार नाही. गद्दार सत्तेवर आल्यापासून एकही रोजगार आलेला नाही. राज्यात उद्योजक यायला तयार नाही. 40 गद्दार येतात, खोके मागतात, त्यामुळे उद्योजक राज्यात यायला तयार नाही. वेदांत फॉक्सकॉनसह अनेक प्रकल्प गुजरातला गेले. 40 गद्दारही गुजरातला का गेले ते समजले. जे उद्योग आपल्या काळात राज्यात 100 टक्के येत होते, ते राज्याबाहेर कसे गेले? इतर राज्यातले मुख्यमंत्री आपल्या राज्यात येतात आणि इकडचे प्रकल्प पळवून नेतात’, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुकाबला करण्यासाठी आपल्या एकीची व्रजमूठ करा

‘शक्तीमान नेत्याला आपण वरळीत लढण्याचे आव्हान दिले होते, मात्र, त्यांच्यात हिंमत नाही. त्यांनी संघर्ष केला नाही, संघर्ष शिवसैनिकांनी केला. त्यांच्या प्रेमामुळेच तुम्ही या पदावर आहात. आपण त्यांना ठाण्यातून लढण्याचे आव्हान दिले, आता आपल्या मागे त्यांनी यंत्रणा लावल्या आहेत. पक्ष चोरला, नाव चोरले, चिन्ह चोरले, त्यांच्या माथ्यावर गद्दार छापा बसला आहे, तो आता पुसला जाणार नाही. आता ही शिवसेनेची लढाई राहिलेली नाही, ही लोकशाही रक्षणासाठी ही लढाई आहे. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत त्यामुळे विजय आमचाच होणार आहे. महाराष्ट्राला सोन्याचे वैभव पुन्हा मिळवायचे आहे. ही लढाई खूप मोठी आहे. आपल्याला फोडण्याचे प्रयत्न होणार आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपल्या एकीची व्रजमूठ करा’, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – ‘ये डर अच्छा है…’, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल