घरमहाराष्ट्रकधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन पण...; मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंना शब्द

कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन पण…; मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंना शब्द

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन असं सांगतील असं कोणाला वाटणार नाही. परंतु खरंच उद्धव ठाकरे यांनी राणेंना फोन करा म्हणून सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना ‘राणे तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन पण फक्त सावंतवाडीतून बोलतोय असं सांगा’ असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या सल्ल्याने सर्व अवाक् झाले. पण काहीच वेळात ते नारायण राणे नेमके कोण याचा उलगडा झाला आणि सर्वांचा भ्रमनिरास झाला.

नेमकी घटना काय आहे?

ही घटना मागील आठवड्यातील आहे. नारायण राणे गेल्या आठवड्यात रत्नागिरीमधील शासकीय विश्रामगृहात निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी, ‘राणे, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन, पण फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा,’ असं सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा हा संवाद रत्नागिरीत घडला. मात्र काही वेळातच याचा उलगडा झाला की, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणारे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री राणे नव्हते, तर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण राणे होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -