घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराज्यपाल हटाव मोहीम; नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

राज्यपाल हटाव मोहीम; नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शने केली जात आहे. नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र पाठविले जाणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बद्दल वारंवार वादग्रस्त आणि अवमान करणारे वक्तव्य करत असल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलने केली जात आहे.नाशिकमध्ये अभिनव प्रकारे आंदोलन करण्यात आले आहे. नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील विविध भागातून राज्यपाल हटवा या आशयाखाली पत्र तयार लिहून लाखों पत्र पाठविले जाणार आहे.

- Advertisement -

काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या वतिने राज्यपाल हटाव मोहीम राबविली असून शहरातील विविध नागरिकांकडून पत्र लिहून घेतले जाणार आहे, त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. गांधीगिरी पद्धतीने शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांची प्रतिमा घंटागाडीत टाकून शिवजन्मोत्सव समितीने निषेध नोंदवला होता. आता पुन्हा गांधीगिरी पद्धतीने राज्यपाल हटवा मोहीम राबवत लाखों पत्र लिहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र पाठवून राज्यपाल हटविण्याची मागणी करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -