घरमहाराष्ट्रकान्हेरी गुफा पर्यटनस्थळ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असलेले 'हे' गाव तीर्थक्षेत्र;...

कान्हेरी गुफा पर्यटनस्थळ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असलेले ‘हे’ गाव तीर्थक्षेत्र; मंगलप्रभात लोढांची घोषणा

Subscribe

मुंबईः कान्हेरी गुंफा आणि वज्रेश्वरी मंदिर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत गुरुवारी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेले लातूर येथील पानगाव हे तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याचेही मंत्री लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

कान्हेरी गुंफा, वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणांना पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी उद्धव गटाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी विधानसभेत केली होती. त्याची दखल घेत मंत्री लोढा यांनी कान्हेरी गुंफा, वज्रेश्वरी मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून आताच घोषित करण्यात येत असल्याचे मंत्री लोढा यांनी विधानसभेत सांगितले. तर डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी लातूर येथील पानगाव येथे आहेत. हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली होती. ही मागणी मान्य करत पानगाव हे तिर्थक्षत्र म्हणून घोषित करण्यात येत असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

लातूर पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. येथे भव्य स्मारकही उभारले गेले आहे. डॉ. आंबेडकर यांची जयंती, १४ एप्रिल, महापरिनिर्वाण दिन, ६ डिसेंबर व धम्मचक्र प्रवर्तन दिनाला येथे डॉ. आंबेडकर अनुयायांची येथे गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणाला तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी अमित देशमुख यांनी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने या ठिकाणाला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

तर बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) येथे कान्हेरी गुंफा आहे. येथे लाखो पर्यटक येत असतात. तसेच वज्रेश्वरी मंदिर येथेही पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या ठिकाणांना पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार मनिषा चौधरी यांनी केली होती. ही मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे या ठिकाणांना अधिक सोयीसुविधा मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -