Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अंधेरी पोटनिवडणूक रद्द करा; अपक्ष उमेदवाराची मागणी

अंधेरी पोटनिवडणूक रद्द करा; अपक्ष उमेदवाराची मागणी

Subscribe

अंधेरी पोटनिवडणुकीवर राज्यात मोठे राजकारण पाहायला मिळाले. सत्तांतरणामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र भाजपने उमेदवार मागे घेताच ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशात या निवडणुकीपूर्वी अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे. अनेक कारणांसाठी अंधेरी पोटनिवडणूक चर्चेत आली आहे. त्यात आता अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे आणखी ट्विस्ट आला आहे. (canceled Andheri assembly bypolls election Demand for independent candidate)

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोधात व्हावी यासाठी निवडणूकीतीन माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. कांबळे यांच्या तक्रारीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीत पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात भाजपने मुरली पटेल यांना मैदानात उतरवले होते. मात्र ऐनवेळी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. मात्र ऋतुजा लटकेंच्या विरोधात आणखी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. मात्र भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या माघारीमुळे लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

यात आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरच कांबळे यांनी आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाब आणला असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.


एअरबस प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार हे वर्षभरापूर्वीच ठरलेले; पण तरीही…- उदय सामंत

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -