घरताज्या घडामोडीफडणवीसांनी केलेल्या सर्व महामंडळांवरील नियुक्त्या रद्द

फडणवीसांनी केलेल्या सर्व महामंडळांवरील नियुक्त्या रद्द

Subscribe

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सपाटा लावला आहे. मेट्रोच्या आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिल्यानंतर, नाणार, आरे आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्री ठाकरे भाजपला आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. भाजप सरकारने महामंडळावर केलेल्या सर्व नियुक्त्या महाविकास आघाडी रद्द करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय लवकरच घेणार असून तसे आदेश त्वरित निर्गमित होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचे धोरण महाविकास आघाडीच्या सरकारने स्वीकारले आहे.

- Advertisement -

आरे कारशेडसंबंधित तरुणांवरील गुन्हे मागे घेणे, महापरिक्षा पोर्टल रद्द करणे असे अनेक निर्णय घेतलेले असतानाच हा महामंडळावरील नियुक्त्या रद्द करणे हे भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मधील नाराजांची महामंडळांवर वर्णी लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून त्यामाध्यमातून भाजप सरकारच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती कशी होती, याची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णयही मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -