Homeमहाराष्ट्रBombay HC : दारूच्या बाटल्यांवरही आता कॅन्सरचा इशारा ? उच्च न्यायालयात याचिका

Bombay HC : दारूच्या बाटल्यांवरही आता कॅन्सरचा इशारा ? उच्च न्यायालयात याचिका

Subscribe

दारू आरोग्यासाठी वाईट असते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, यामुळे कॅन्सरचा देखील धोका संभावत असल्यावरून आता नव्याने वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Warning On Liquor Bottle : मुंबई : दारू आरोग्यासाठी वाईट असते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, यामुळे कॅन्सरचा देखील धोका संभावत असल्यावरून आता नव्याने वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि अन्न सुरक्षा तसेच मानक प्राधिकरणाने दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरचा इशारा देणे अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता यश चिलवर यांनी ही याचिका केली आहे. (cancer warnings should be on liquor bottles the petition reached the high court)

बार ऍण्ड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, दारू आणि कॅन्सरचा थेट संबंध आहे. मात्र, याचा उल्लेख दारूच्या बाटल्यांवर स्पष्ट आणि मोठ्या अक्षरात केला जात नाही. याचिकाकर्ता चिलवर यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दारूचा उल्लेख ‘क्लास I कार्सिनोजन’ म्हणजेच कॅन्सर होण्याला कारणीभूत ठरणारा पदार्थ असा केला आहे. मात्र, तरीही ही महत्त्वपूर्ण माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मात्र, एखादी व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करतो, तेव्हा त्याला त्या उत्पादनाशी संबंधित माहिती घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे.

हेही वाचा – MPSC Exam : परीक्षा पारदर्शकपणेच होणार, आयोग ठाम, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

चिलवर यांनी आपल्या याचिकेत अमेरिकेतील सर्जन जनरलच्या ताज्या अहवालाचा हवाला दिला आहे. दारू प्यायल्याने सात प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका असल्याचे यात म्हटले आहे. यात ब्रेस्ट कॅन्सर, तोंड, अन्ननलिका आदींचा समावेश आहे. यामुळेच दारूच्या बाटल्यांवर दारू कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते, असा स्पष्ट उल्लेख सरकारने करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला ठोस नियम तयार करण्याचे निर्देश द्यावेत तसेच हा निर्णय लागू करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करावी, असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

आयर्लंड, दक्षिण कोरिया यांसारख्या विकसित देशांमध्ये दारूच्या बाटल्यांवर असा इशारा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. भारतात देखील असा नियम केला जाणे आवश्यक आहे. यामुळे दारूचे दुष्परिणाम रोखण्यात थोडी तरी मदत होईल, असेही चिलवर सांगतात.

हेही वाचा – Supreme Court : महाकुंभातील चेंगराचेंगरी विरोधात जनहित याचिका, अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी