घरताज्या घडामोडीऐकावं ते नवलच! डिपॉझिट भरण्यासाठी उमेदवाराने आणली चिल्लर; मोजताना अधिकाऱ्यांची नाकीनऊ

ऐकावं ते नवलच! डिपॉझिट भरण्यासाठी उमेदवाराने आणली चिल्लर; मोजताना अधिकाऱ्यांची नाकीनऊ

Subscribe

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यावरून प्रमुख पक्षांमध्ये वाद सुरू असतानाच दुसरीकडे मात्र एका उमेदवाराने अर्ज दाखल करण्याकरीता डिपॉझिट भरण्यासाठी चक्क 10 हजार रुपयांची चिल्लर आणल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यावरून प्रमुख पक्षांमध्ये वाद सुरू असतानाच दुसरीकडे मात्र एका उमेदवाराने अर्ज दाखल करण्याकरीता डिपॉझिट भरण्यासाठी चक्क 10 हजार रुपयांची चिल्लर आणल्याचा प्रकार समोर आला आहे. राजू काळे असं या उमेदवाराचं नाव असून त्यांनी रयत विद्यार्थी परिषदेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (candidate raju kale brought coins of 10 thousand rupees while filling application form in chinchwad assembly by election in pune)

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजू काळे यांनी रयत विद्यार्थी परिषद संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवार राजू काळे यांनी दिलेल्या 10 हजार रुपयांची चिल्लर (डिपॉझिटची रक्कम) मोजताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. 10 हजरांची चिल्लर बघताच चक्रावलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना हातातली कामे सोडून गोणीभर चिल्लर मोजत बसावे लागले. अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र बसून तासभर चिल्लर मोजल्यानंतर रक्कम 10 हजार असल्याची खात्री झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी राजू काळे यांचा अर्ज दाखल करून घेतला. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये येत्या २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी चिंचवडमध्ये भाजपाकडून आश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीनं राहुल कलाटे यांना डावलून नाना काटे यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.


हेही वाचा – कसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडखोरांना रोखण्यात यश येईल का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -