डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही ‘एन-९५’ मास्क

पी.पी.ई किट्स आणि एन-१९ मास्क घेण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन जा.

anandwan baba amtes family lends a hand in covid 19 fight producing 40 thousand masks

सध्या जगभरात करोना व्हायरल थैमान घालत आहे. या करोना व्हायरसने भारतात देखील आता प्रवेश केला आहे. चीन आणि इतर देशांमध्ये करोना व्हायरस लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तसंच भारतात करोना व्हायरस लागण झालेल्या संशयितांमध्ये देखील संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. परंतु अद्यापही महाराष्ट्रात करोना व्हायरस लागण झालेला एकही रुग्ण आढलेला नाही आहे. तरी देखील देशांमध्ये वाढत असलेला संसर्ग लक्षात घेता, राज्यामध्ये विविध पातळ्यांवर करोना व्हायरसबाबत दक्षता घेण्याचा दृष्टीने शासनाने नियोजन सुरू केले आहेत. करोना पासून वाचवण्याकरिता सध्या पी.पी.ई किट्स आणि एन-१९ मास्क वापर केला जात आहे. आता हाच मास्क घेण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी असणे गरजेच आहे. पी.पी.ई किट्स आणि एन-९५ मास्कची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषध दुकानातून होणार नाही, असा आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

या मास्कची विक्री करताना मूळ किंमती व्यक्तिरिक्त दुकानदाराकडून जादा दर आकारणी होत असल्याच निदर्शनास आले आहे. तसंच अनावश्यक खरेदी करून साठा होत असल्याच समोर आलं आहे. म्हणूनचं अन्न व औषध प्रशासनाने हे मास्क खरेदी करण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पी.पी.ई किट्स आणि एन ९५ मास्क घेताना डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन जा.

काय आहेत करोनाची लक्षणे?

पुढील लक्षणे करोनाची लागण झाल्यानंतर २ ते १४ दिवसपर्यंत दिसतात. करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसतात. तसेच डोकेदुखी, नाक गळणे, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, निमोनिया, फुफ्फुसात सूज अशीही लक्षणे जाणवतात. त्यामुळे वरील लक्षणे सतत जाणवल्यास डॉक्टरकडे जाऊन नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे याची योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.


हेही वाचा – करोना व्हायरसमुळे शेअर बाजार घसरला!