घरमहाराष्ट्रकलाकाराचा वेष घेऊन गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, आव्हाडांचा कोल्हेंना घरचा...

कलाकाराचा वेष घेऊन गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, आव्हाडांचा कोल्हेंना घरचा आहेर

Subscribe

त्यावरूनच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. अमोल कोल्हेंना घरचा आहेर दिलाय. डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरून वाद उफाळून आलाय. नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून हा नवा वाद निर्माण झालाय. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यात डॉ. अमोल कोल्हे पाहायला मिळतायत.

त्यावरूनच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. अमोल कोल्हेंना घरचा आहेर दिलाय. डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत. विनय आपटे आणि शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केला, त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार असल्याचही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

- Advertisement -

दुसरीकडे अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याला विरोध दर्शवलाय. अमोल कोल्हेंचा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 30 जानेवारीला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र ट्रेलर प्रदर्शित होताच होणाऱ्या विरोधावर आता अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. “हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही” असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट केलीय.

- Advertisement -

अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 2017 साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं. डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.”असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले.


हेही वाचाः Cabinet decision : १२ जलसंपदा प्रकल्पांना ६२४ कोटींच्या मर्यादेत निविदा निश्चितीस मान्यता, राज्यमंत्रिमंडळाचे ६ निर्णय वाचा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -