Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 3 ठार, 4 जखमी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 3 ठार, 4 जखमी

Subscribe

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. चारोटी येथे असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर जवळील पुलावर हा अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी ठार तर चार प्रवासी जखमी झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. चारोटी येथे असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर जवळील पुलावर हा अपघात झाला. या अपघातात तीन प्रवासी ठार तर चार प्रवासी जखमी झाले आहे. (Car Accident On Mumbai Ahmedabad National Highway Three Killed Two Seriously Injured)

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात नरोत्तम छना राठोड (६५), केतन नरोत्तम राठोड (३२) आणि आर्वी दीपेश राठोड (१) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दीपेश नरोत्तम राठोड (३५), तेजल दीपेश राठोड (३२), मधु नरोत्तम राठोड (५८) आणि स्नेहल दीपेश राठोड (२.५) हे जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, नालासोपारा पश्चिम येथील राठोड कुटुंबीय भिलाड (गुजरात) येथे जात असताना दुपारी सव्वा वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गीकेवर श्री महालक्ष्मी मंदिराच्या एक किलोमीटर पुढे असलेल्या रस्त्यावरील खड्डा चुकवताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

गाडीचा चालक दीपक राठोड यांचा अंदाज चुकल्याने पुढे असलेल्या कंटेनर ट्रकला मागच्या बाजूने या कारने जोरात धडक दिली. या अपघातातील जखमींपैकी दोघेजण गंभीर असल्याने त्यांना वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यामध्ये एक वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, ओव्हरटॅक करताना हा अपघात प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याआधी बीड जवळील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यात पाच दुचाकी आणि ट्रक्टरचा चक्काचूर झाला होता. सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या ट्रकने बीड जवळ असलेल्या मंजिरी फाट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.


हेही वाचा – 1993’च्या बॉम्बस्फोट मालिकेची पुन्हा धमकी; आरोपीला पोलिसांकडून अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -