Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर एक जखमी

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर एक जखमी

Subscribe

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. तसेच या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजीक असलेल्या दुसरबीड जवळ मेहकरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारी कार दुभाजकाला धडकली आणि कारने अचानक पेट घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकरकडून एमएच ०२-सीआर-१४५९ क्रमांकाची कार ही मुंबई कॅरिडॉरच्या दिशेने जात होती. परंतु दुसरबीड गावानजीक आल्यानंतर समृद्धी महामार्गावरील मिडीयममधील सिमेंटच्या रस्ता दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या व्यक्तीचं नाव अजय दिनेश भिलाला (२२) असं आहे. पण दोन मृतांची अद्यापही ओळख पटलेली नाहीये.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांनी मिळाली असता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी अजय भिलाला या तरुणास तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तर मृत पावलेल्या दोघांचे पार्थिव रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा अपघात झाल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने वाहन बाजूला करण्यात आले आणि त्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या काही महिन्यात वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २३ मे रोजी मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला होता. ही घटना बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे घडली होती. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. तर अपघातात १३ जण जखमी झाले होते. आज पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : वांद्रे वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचे नाव देणे कितपत योग्य? काँग्रेसचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल


 

- Advertisment -