घरमहाराष्ट्रयवतमाळमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात; ५ ठार

यवतमाळमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात; ५ ठार

Subscribe

भरधाव वेगात असलेल्या कार आणि ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की, या ५ प्रवासी जागीच ठार झाले आहेत.

यवतमाळमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि ऑटोमध्ये भीषण अपघात झाला आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वडकी गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १६ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भरधाव वेगात असलेल्या कार आणि ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की, या ५ प्रवासी जागीच ठार झाले आहेत तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचुर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सर्व जखणींवर राळेगाव आणि वडणेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी दोन्ही गाड्या बाजूला काढू महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर करण्याचे काम सुरु आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -