घरताज्या घडामोडीऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर पुरवठयाबाबत सुक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी

ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर पुरवठयाबाबत सुक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी

Subscribe

जिल्हा रूग्णालयाला भेट देत केली पाहणी

दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागातील रुग्णालय व कोविड केअर सेंटर मधील बेडची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आरोग्य विभागाच्या
अधिकार्‍यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी जिल्हा रूग्णालयाला भेट देत आढावा घेतला यावेळी ते म्हणाले, ऑक्सिजनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियत्रण अधिकारी म्हणून काम पाहणारे डॉ. श्रीवास यांनी आक्सिजनची माहिती संकलनाबरोबरचं खाजगी रुग्णालयांना भेटी देवून सर्व रुग्णालयांमध्ये आक्सिजनचा वापर नियमाप्रमाणे होतो किंवा नाही याची खात्री करावी. आक्सिजन वाया जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचा उपचारा दरम्यान आक्सिजन पुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता घेवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. तसेच जिल्ह्यात दौरे करुन ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पुरेशी व्यवस्थेची तपासणी करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

- Advertisement -

ग्रामीण भागातील व्हेंटीलेटरचा सुयोग्य वापर करण्यात यावा. जिथे आवश्यकता आहे तिथे व्हेंटीलेटर ठेवून उर्वरीत
व्हेंटीलेटर जे रुग्णालय वापरु शकते या ठिकाणी वर्ग करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना
यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात यावी. तसेच ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर बरोबर खासगी रुग्णालय देखील अधिग्रहीत करण्यात यावे. कोरोनारुग्णांना तात्काळ उपचार होण्यासाठी एसएमबीटी, मविप्र रुग्णालये अधिग्रहीत करण्यात यावी. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची व कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती वेळेवर पोर्टलवर भरण्याची सूचना देण्यात आल्या. कोविड बाधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात येणार्‍या कक्षाला, तसेच नव्याने तयार करण्यात येणार्‍या रुग्ण वर्गीकरण विभागाची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी केली आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत खरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -