घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडेल महागात; 'इतका' होईल दंड

अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडेल महागात; ‘इतका’ होईल दंड

Subscribe

नाशिक : अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देवू नये अन्यथा, पालकांना शिक्षा व दंडात्मक करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिला आहे.

मोटार वाहन कायद्यांतर्गत 16 वर्षाखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला तर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणार्‍या मुलांच्या पालकांना तीन वर्ष कारावास व 25 हजार रूपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालविल्यास चालकास रूपये 5 हजाार व वाहन मालकास 5 हजार असा एकूण 10 हजार रूपये दंड व शिक्षेची तरतुद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायुवेग पथकामार्फत जिल्हा व शहरात जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात येवू नये, असे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथील अधिकारी वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जाऊन करीत आहेत. पालकांनी याची गांर्भीयाने दखल घ्यावी, असे आवाहनही प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

नियम काय सांगतो?

मोटर वाहन कायद्यानुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वैध लायसन्सशिवाय 50 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचं इंजिन असलेलं वाहन चालवण्याची परवानगी नाही. वाहनाच्या इंजिनची क्षमता 50 सीसीपेक्षा जास्त असल्यास लर्निंग लायसन्स असणं आवश्यक आहे. तसंच कोणीही 25 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी इलेक्ट्रिक टू-व्हीलर चालवू शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारच्या लायसन्सची किंवा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. परंतु, जर मुलगा किंवा मुलगी खूप लहान असेल, आणि गाडी चालवू शकत नसेल, तर अशावेळी मुलाच्या सुरक्षिततेबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करणं ही पालकांची जबाबदारी बनते. पालकांनी त्यांच्या मुलाला कायद्याने विहित केलेली वयोमर्यादा पूर्ण केल्याशिवाय गाडी चालवण्याची परवानगी देऊ नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -