घरताज्या घडामोडीदिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ : नितीन गडकरी

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ : नितीन गडकरी

Subscribe

'मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील', असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

‘मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. सिन्नर येथे लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. (Carrying forward the legacy of late Gopinath Munde thoughts says union minister Nitin Gadkari)

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित जनतेला संबोधित केले. त्यावेळी “लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पिडीत, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णाखोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले”, असे नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

“मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच उर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे”, असेही नितीन गडकरी म्हणाले.

त्याशिवाय, “आजच्या स्मारकामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून असा नेता पुन्हा होणार नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार आहे”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – G-20 : नागपूरचा चांगला अहवाल जगभरात जाणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -