घरमहाराष्ट्रशिवसेनेची मशाल घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहे, फोटो शेअर करत अंधारेंनी भुजबळांना करून...

शिवसेनेची मशाल घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहे, फोटो शेअर करत अंधारेंनी भुजबळांना करून दिली आठवण

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक फोटो शेअर करत राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांना 2017ची आठवण करून दिली आहे. त्याचवेळी, शिवसेनेची मशाल घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – आरक्षणाच्या नावावर नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे? सुषमा अंधारेंचा भुजबळांना थेट सवाल

- Advertisement -

आरक्षणासंदर्भात सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर छगन भुजबळ यांना एक अनावृत्त पत्र लिहिले आहे. त्याबरोबर एक फोटो शेअर करताना सुषमा अंधारे यांनी भुजबळ यांना उद्देशून म्हटले आहे की, हा फोटो तुम्हाला आठवतो का? गणराज्य संघाची स्थापना 26 नोव्हेंबर 2017ला होताना त्याचे साक्षीदार म्हणून तुम्ही नाशिकला खास उपस्थित होतात. काय योगायोग आहे सर, गणराज्य संघाची स्थापना होत असतानाच एक मशाल तुम्ही माझ्या हातात दिली आणि आज शिवसेनेची मशाल घेऊन सबंध महाराष्ट्र भर मी फिरत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

गणराज्य संघाच्या मंचावर आपल्यालाच का बोलवायचे याची अनेक कारण माझ्याकडे होती. त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे ओबीसीचे राजकारण उभे राहत असताना क्रांतीज्योती सावित्रमाई किंवा क्रांतीबा यांच्या संबंधाने आपण घेतलेल्या थेट भूमिका या माझ्या वैचारिक अधिष्ठानाशी नाते सांगणाऱ्या होत्या. त्याच मंचावर आपण केलेले भाषण आपल्याला आठवते का? आपण त्या भाषणात भाजपावर सडकून टीका केली आणि भाजपा जाती-जातीमध्ये कशी तेढ निर्माण करत आहे आणि ही जाती धर्मातील तेढ कमी करून संविधानिक चौकट आपल्याला कशी वाचवायची आहे यावर आपण बोलला होतात, याचेही स्मरण त्यांनी करून दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – या अश्रूंची कधीतरी फुले होतील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रोहित शर्माला प्रोत्साहन

काल-परवापर्यंत आपण भाजपावर एवढी जहरी टीका करत असताना आता भाजपाशी हात मिळवणी का केली, हा प्रश्न मी आपल्याला अजिबात विचारणार नाही. कारण चित्रपटातली चित्रे, नाटकातली पात्रे आणि राजकारणातील मित्र कधीच खरे नसतात, हे वाक्य मला ज्ञात आहे. त्यामुळे राजकारणात कुणीही कुणासाठीही सदासर्वकाळ स्पृश्य किंवा अस्पृश्य असू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -